
दिल्ली, दि. ११ – बिहारच्या आणखी एक बाहुबलीने तुरूंगातून पीएचडी केली आहे. याप्रकारे विजय कुमार शुक्ला उर्फ मुन्ना शुक्ला बिहारचे तिसरे नेते बनले ज्याने कैदी रूपात पीएचडीची डिग्री प्राप्त केली. तो बिहारचे चर्चित नेते व मंत्री बृजबिहारी प्रसाद यांच्या हत्या प्रकरणी सध्या मुजफ्फरपुर तुरूंगात बंद आहे. बिहारचे माजी मंत्री बृज बिहारी प्रसाद यांची हत्या १९९८ मध्ये झाली होती.
