अभिनेत्री माधुरी दीक्षितने काही दिवसापूर्वीच अंधेरीतील प्रसिद्ध लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये ऑफिस खरेदी केले आहे. आता या ऑफिसमधूनच माधुरीचे चित्रपटाच्या निर्मिती क्षेत्रात उतरण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

आगामी काळात माधुरीला या कामात तिचा पती डॉ. श्रीराम नेने मदत करणार असल्याचे समजते. पेशाने डॉक्टर असलेल्या नेने यांनी वैद्यकीय क्षेत्र सांभाळण्यासोबतच माधुरीला चित्रपट निर्मिती क्षेत्रात मदत करायचे ठरविले आहे. सध्या तिच्या ऑफिसच्या इंटेरियर डेकोरेशनचे काम सुरु आहे. हे काम सुमारे चार ते पाच महिने चालेल असा अंदाज आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर माधुरी तिच्या प्रोडक्शन हाउसची व कमीत कमी तिच्या दोन नव्या चित्रपटची घोषणा करणार आहे.
गेल्या काही दिवसापासून माधुरी व तिच्या पतीने चित्रपट सृष्टीतील काही दिग्दर्शकांच्या भेटी घेतल्या आहेत. तिला सर्वच दिग्दर्शकानी मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान अभिनेत्री असलेल्या अमिषा पटेलने काही दिवसापूर्वीच निर्मिती क्षेत्रात पावले ठेवली असून तिनेही नुकतेच देसी मैजिक व पराडेज स्ट्रीट या दोन चित्रपटाची घोषणा केली आहे. दोन दिवसापूर्वीच ती तुर्कीमधून रेस २ या चित्रपटाचे शुटींग पूर्ण करून आली आहे