एकीकडे अभिनेत्री ऐश्वर्या रॉय तिची मुलगी आराध्याला दुनियाच्या नजरेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. तर बॉलीवूडमधील अभिनेत्री सेलिना जेटलीच्या जुळ्या मुलाची छायाचित्रे प्रसिद्ध अशा पीपल या मासिकाच्या कव्हर पेजवर झळकत आहेत.

सेलीना जेटली सध्या तिचे पती पीटर आणि मुले विस्टन आणि विराज सोबत मुंबईमध्ये राहत आहे. महिनाभरापूर्वीच सेलिना व पीटर भारतात आले आहेत. मात्र त्याच्या दोन्ही मुलांना लवकर व्हिसा मिळाला नसल्याने त्यांना आणण्यासाठी पुन्हा एकदा सेलिनाला दुबईला जावे लागले होते. दोन्ही मुले पहिल्यांदाच भारतात आली आहेत.
विस्टनचे डोळे आई सेलिना सारखे चमकदार आहेत तर विराजचे डोळे पीटर सारखे आहेत. दोघाचे फोटो प्रसिद्ध अशा पीपल या मासिकाच्या कव्हर पेजवर झळकत असल्याने सेलिना सध्या खूष आहे. गेल्या काही दिवसापूर्वी तिच्या या दोन मुलांची फोटोसाठी विचारणा करण्यात आली होती. त्यास सेलीनाने लगेचच होकार दर्शविला होता. तिच्या दोन मुलांचे फोटो प्रसिद्ध केल्याबद्दल तिने पीपल या मासिकाचे आभार मानले आहेत