बोल बच्चनने टाकले रावडी राठोडला मागे

बोल बच्चन चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील ओपनिंग सुरवातीच्या काळात फारशी दमदार झाली नसली तरी गेल्या दोन दिवसात चित्रपटाने आपली जादू दाखवायला सुरुवात केली आहे. फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेर सुद्धा हा चित्रपट चांगला बिझीनेस करीत आहे.

बोल बच्चन या चित्रपटाची ओपनिंग बघितल्यानंतर हा चित्रपट फार चालणार नाही ; असा अंदाज समीक्षकानी व्यक्त केला होता. मात्र दुसऱ्याच दिवसापासून बोल बच्चन चित्रपटाने जोरदार पुनरागमन केले  आहे. गेल्या दोन दिवसातील आकडेवारी पहिले तर रोहित शेट्टीचा बोल बच्चन चित्रपट विदेशी मार्केटमध्ये अक्षयच्या रावडी राठोड, सलमान खानच्या बॉडीगार्ड व रितिक रोशनच्या अग्निपथपेक्षा जास्त  कमाई करत आहे.

न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियामध्ये या इतर चित्रपटाच्या तुलनेत बोल बच्चनने चांगली कमाई केली आहे. या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चनने प्रथमच डबल रोल केला आहे. त्याला अजय देवगणने साथ दिली असून असीन आणि प्राची देसाई यांची  प्रमुख भूमिका आहे. त्याशिवाय असरानी आणि अर्चना पूरणसिंहने दमदार भूमिका केली आहे. हा चित्रपट जुन्या गोलमाल चित्रपटावर आधारित असून या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चनने ही एका गाण्यात झलक दाखवली आहे.

Leave a Comment