कर्नाटकातील नेतृत्व बदल योग्य – शरद यादव

पाटणा दि.९ – कर्नाटकात सदानंद  गौडा ऐवजी जगदीश शेट्टर यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्याचा भाजप पक्षश्रेष्ठींचा निर्णय योग्य असल्याचे मत ‘एनडीए’ चे अध्यक्ष व संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राज्यातील लिंगायत समाजाला पक्षाबरोबर ठेवण्यासाठी घेतलेला नेतृत्व बदलाचा निर्णय योग्य आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जातीवाद हे केवळ कर्नाटकातच नाही तर, संपूर्ण देशातील ती वास्तव आहे. आणि राजकारणावरही त्याचा पगडा कायम आहे, लिंगायत समाज संयुक्त जनता दलापासून दूर गेला व त्याने भाजपला साथ दिली, हे वास्तव आम्ही स्वीकारले आहे.
 भाजप २००८ मध्ये कर्नाटकात सत्तेवर आल्यापासून  शेट्टर हे राज्याचे तिसरे मुख्यमंत्री आहेत.