
मुंबई दि.९ – हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते व पैलवान दारासिंह हे गेल्या ३६ तासांपासून कृत्रिम श्वाच्छोश्वासावर असून त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सोमवारी सकाळी सांगितले. डॉक्टरांचे एक पथक दारासिंह यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहे. सध्या दारासिंह लाईफ सपोर्ट सिस्टीमवर असल्याने त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या चाचण्या घेता येत नाहीत. त्यांच्या प्रकृतीत सुधारण होत नसल्याने डॉक्टरही चिंताग्रस्त आहेत.
