
बंगलोर दि.५- देशभरातील रिटेल स्टोअर्समधून सौर उर्जेवर चालणारी उत्पादने उपलब्ध करून देण्याचे बंगलोर येथील अनु सोलर प्रा.लिमि. या सौर उत्पादनातील अग्रेसर कंपनीने ठरविले असून या उत्पादनात सौरबंब, सौर दिवे, सौर बॅटर्या, सौर पंखे असलेल्या टोप्या, सौर कॅलक्युलेटर, इन्व्हर्टर अशा अनेकविध उत्पादनांचा समावेश आहे.
