ऍपलचा छोटा आयपॅड लवकरच

सॅन फ्रान्सिस्को, दि. ५ – संगणक आणि मोबाईल क्षेत्रात आघाडीवर असणारी ऍपल कंपनी यंदा छोटा आयपॅड सादर करण्याची शक्यता आहे. या क्षेत्रातील प्रतिस्पर्धी मायक्रोसॉफ्ट आणि गुगलचे आव्हान मोडून काढण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ब्लूमबर्ग न्यूजने बुधवारी दिली आहे. मायक्रोसॉफ्टनेही नुकतीच उच्च दर्जाचा आयपॅड व विंडोज ८ वर चालणारा टॅब्लेट बाजारात आणणार असल्याची घोषणा केली होती.

या आयपॅडचा स्क्रीन लांबी-रुंदीने सुमारे सात ते आठ इंच एवढ्या आकाराचा असेल आणि किंमतही कमी असेल, अशी माहिती ब्लूमबर्गने दिली आहे. गेल्याच आठवड्यामध्ये गुगलने बाजारामध्ये विविध प्रकारचे सात टॅब्लेट येणार असल्याची माहिती दिली होती. सध्या बाजारात ९.७ इंचाचे आयपॅड उपलब्ध आहेत.

ऍपलच्या छोट्या आयपॅडमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आकार लहान असल्यामुळे हाताळण्यासही सोपा जाणार आहे. त्यामुळे या आयपॅडची मोठ्या प्रमाणात विक्री होईल, असा दावा कंपनीने केला आहे.

दरम्यान, मायक्रोसॉफ्टनेही नुकतीच उच्च दर्जाचा आयपॅड व विंडोज ८ वर चालणारा टॅब्लेट बाजारात आणणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांच्या किमती जाहीर केलेल्या नाहीत.

Leave a Comment