
लंडन, दि. ५ – लंडनमधील एका कॅफेमध्ये एका वेटरेसने ब्रिटनचे पंतप्रधान डेविड कॅमरुन यांना न ओळखून त्यांना रांगेमध्ये उभे राहून कॉफीची प्रतिक्षा करण्यास सांगितले. लंडनच्या एका कॅफेची वेटरेस शैला थॉमसने पंतप्रधानांना न ओळखता त्यांना सांगितले की, ती सध्या इतर ग्राहकांना सेवा पुरविण्यात व्यस्त आहे, यासाठी त्यांना थोडी प्रतिक्षा करावी लागेल.
