सानियाचा उपयोग चुकीचा : भुपती

नवी दिल्ली, दि. २९ – महेश भूपतीने सांगितले की, सानिया मिर्झाशी चर्चा केल्याशिवाय व मत जाणल्याशिवाय तिचा उपयोग केला गेला.

त्याने पुढे सांगितले की, ऑलिम्पिकच्या मिश्र दुहेरी स्पर्धेत त्याची व सानिया मिर्जा जोडीकडे पदक जिंकण्याची चांगली संधी आहे.

टीव्ही चॅनल टाइम नाऊशी चर्चा करताना भूपतीने सांगितले, `विश्वसनीय म्हणून आम्हा दोघांच्या जोडीचा रेकॉर्ड चांगला आहे. आताच आम्ही दोघांनी फ्रेंच ओपनची अंतिम लढत जिंकली आहे. सानियाला तिचा पर्याय विचारल्याशिवाय तिचा उपयोग केला गेला. परंतु आता मला वाटते की, सानियाला एकटे सोडायला हवे.’

सानियाने बुधवारी ऑलिम्पिकमध्ये वाइल्ड कार्ड मिळाल्यानंतर इंडिया टेनिस असोसिएशनवर आरोप लावला होता की, निवड प्रकरणी तिचा उपयोग केला गेला. सानियाने लिएंडर पेस व भूपतीची कानउघडणी केली होती.

सानियाने पुढे म्हटले होते की, भूपतीने आपले वचन निभावले की तो आपला दुहेरी जोडीदार रोहन बोपन्नासह खेळेल; कारण त्याला वाटते की, भारतासाठी हे चांगले आहे.

सानियाने पुढे म्हटले होते की, या प्रक्रियेत भूपतीने त्या वचनबद्धतेला धारेवर ठेवले ज्यात त्यांनी तिच्यासोबत खेळणे व ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते.

सानियाने स्वीकारले होते की, ती भूपतीसह खेळू इच्छिते. परंतु देशाच्या हितात ती पेससोबत उतरण्यास तयार आहे.

भूपतीने सांगितले, `मी व माझे इतर साथी हा पूर्ण वाद सोडून विंबलडनवर लक्ष केंद्रित करू इच्छितात. ही लंडन ऑलिम्पिक आयोजनाचे स्थळ आहे.’

ऑलिम्पिकमध्ये भारतीय टेनिस संघावरून मागील काही कालावधीपासून वाद सुरू आहे.