लष्कर-ए-तोयबाच्या मुजफ्फराबादला प्रशिक्षण छावण्या

नवी दिल्ली दि.२९- पाक व्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबाद येथे लष्कर-ए-तोयबाचे प्रशिक्षण केंद्र असून तेथे पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण दिले जाते, अशी कबुली २६/११चा मास्टर माईन्ड अबू जुंदाल यांनी शुक्रवारी दिल्ली पोलिसांना दिली.

खुद्द जुंदालने पॅराग्लायडिगचे प्रशिक्षण घेतलेले आहे का, याचा शोध पोलीस घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वतः जुंदाल हा २६/११ च्या अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्यार्‍या छावणीचा प्रमुख होता त्यामुळे त्याने पॅराग्लायडिगचे प्रशिक्षण घेतले असल्याची शक्यता पोलीस नाकारत नाहीत.
फेसबुकवर जुंदालचे कोणकोणते मित्र आहेत, त्यांचे कार्य कोणत्या प्रकारचे आहे, याचाही तपास पोलीस पथक घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment