लंडन, दि. २९ – ही बातमी वाचल्यानंतर कदाचित तुम्ही पेप्सी किंवा कोका कोला पिण्यापूर्वी दहा वेळा विचार कराल. एका संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार जगातील सर्वात लोकप्रिय सॉफ्ट ड्रिंक्स कंपनी कोका कोला आणि पेप्सीमध्ये अल्कोहोल आढळून आले आहे.

ब्रिटिश वृत्तपत्र डेली मेलच्या एका अहवालानुसार फ्रान्सची राजधानी पॅरीस येथील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ कंन्झमशनच्या अभ्यासानुसार जगातील सुमारे ६ प्रसिद्ध सॉफ्ट ड्रिंक्स ब्रँडमध्ये अल्कोहोलची मात्रा आढळून आली आहे. यामध्ये पेप्सी, कोका कोला सारख्या नामवंत कंपन्यांचा देखील समावेश आहे. या संस्थेने केलेल्या अभ्यासात कोका कोलामध्ये अल्कोहोलची मात्रा असून नसल्यासारखीच आहे. एक लिटरमध्ये सुमारे १० मिलिग्रॅम अल्कोहल आढळून आले आहे. याचा अर्थ यामध्ये फक्त ०.००१ टक्के अल्कोहोल आहे. एवढी कमी मात्रा असली तरी ती मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावणारी असल्याचे डेली मेलने म्हटले आहे. इस्लाम धर्मात दारू पिण्यास मनाई आहे.
उल्लेखनीय म्हणजे भारतात कोका कोला आणि पेप्सी सारख्या सॉफ्ट ड्रिंक्स कंपन्याविरोधात योगगुरू रामदेव बाबा हे वारंवार आवाज उठवतात. रामदेव बाबांपासून पर्यावरणवादी नेत्या सुनिता नारायणपर्यंत सर्वांनी सॉफ्ट ड्रिंक्सला विषाची उपमा दिली आहे. पेप्सी आणि कोका कोला कंपनीने कायम हे आरोप फेटाळले आहेत.