गुगलचा `नेक्सस ७’ टॅबलेट लॉन्च

सॅनफ्रान्सिस्को, दि. २९ – वेगवेगळे फोटो, पुस्तके आणि फिल्म्सची ऑनलाईन खरेदी करण्याचा तुम्हालाही छंद असेल, तर आता तुम्हाला `गुगलच्या नेक्सस-७’ या टॅबलेटचाही वापर होऊ शकतो. गुगलने बुधवारी `नेक्सस ˆ७’ हा टॅबलेट कम्प्युटर लॉन्च केल्यामुळे ऍप्पल आयपॅडच्या मक्तेदारीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

नव्या पिढीच्या एन्ड्रॉईड सॉफ्टवेअरच्या साहाय्याने या सात इंचाच्या टॅबलेटमध्ये गुगलने युजर्ससाठी बर्‍याच सुविधा दिल्या आहेत. एखाद्या लहानशा पुस्तकाएवढचे या टॅबलेटचे वजन आहे. हे सॉफ्टवेअर तैवानच्या एसूस कंपनीने बनवले आहे. या टॅबलेटची किंमत कंपनीने १९९ अमेरिकन डॉलर एवढी जाहीर केली आहे.

सॅनफ्रान्सिकोमध्ये गुगलच्या एका वार्षिक संमेलनाची वेळ साधून टॅबलेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गुगलकडून नेहमीच काहीतरी नवे देण्याचा प्रयत्न असतो. यावेळी आम्ही हाच प्रयत्न कायम ठेवला आहे. `नेक्सससाठी आम्हाला ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन आणि अमेरिकेकडून ऑर्डरही मिळाल्यात. जुलै महिन्यात दुसर्‍या-तिसर्‍या आठवड्यापर्यंत आम्ही त्या पूर्ण करू’ असे एन्ड्रॉईड विभागप्रमुख हुगो बर्रा यांनी म्हटले आहे.

टॅबलेट पीसीच्या बाजारपेठेत सर्वात जास्त हिस्सा असणार्‍या ऍपलच्या आयपॅड बरोबरच ऍमेझॉन कंपनीच्या किंडल फायर या सात इंची टॅबलेटला उत्तर देण्यासाठी गुगलने हा टॅबलेट बाजारात उतरवला आहे. किंडल फायर हा टॅबलेट जरी ऍन्ड्रॉइडवर चालत असला तरी या टॅबलेटमध्ये इतर ऍन्ड्रॉइड बेस डिवाइस प्रमाणे गुगलचे सगळेच ऍप्लिकेशन चालत नाहीत.

गुगलने बाजारात आणलेल्या या टॅबलेटचे नाव `नेक्सस सेव्हन’ असे ठेवण्यात आले असून सात इंच स्क्रीन असणार्‍या नेक्ससला १२८० x ८०० इतके रिझोल्यूशन असणार आहे. कॉडकोअर ट्रीगा प्रोसेसरवर चालणार्‍या या टॅबलेटची १.३ गिगाहटर्ज मेमरी असणार असून एक जीबी सॅम असणार आहे.
हा टॅबलेट ऍन्ड्रॉइडच्या नविन व्हर्जन असणार्‍या जेली बीन या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणार आहे. नेक्ससला एससने तयार केले आहे. या टॅबलेट पीसीमध्ये ४ हजार ३२५ एमएएच बॅटरी, १.२ मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा असून टॅबलेटचे वजन ३४० ग्रॅम असणार आहे. हा टॅबलेट जरी वाय फायला सपोर्ट करणार अशला तरी यात ३-जी ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही.

नेक्सस अमेरिकेत १९९ डॉलर (११ हजार ३६९ रुपयांना) आज पासूनच ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध होणार असून ८ जीबीच्या मॉडेलपेक्षा १६ जीबीच्या मॉडेलची किंमत जरा जास्त असणार आहे.  हा टॅबलेट अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनच्या बाजारपेठेत दाखल होणार असला तरी तो जुलैपर्यंत ग्राहकांच्या हातात पडणार आहे. भारतात हा टॅबलेट कधीपर्यंत दाखल होणार आहे, याबद्दल काहीच माहिती देण्यात आली नाही.

जरी ऍन्ड्रॉइडवर चालणारे टॅबलेट पीसी मागील वर्षापासून बाजारात उपलब्ध असले तरी त्यापैकी एकही ऍपलच्या आयपॅडला टक्कर देऊ शकला नाही.

नेक्सस सेव्हनमध्ये टान्सफॉर्मस, डार्क ऑफ द मून यासारख्या मूव्हीसबरोबर काही मल्टीमिडीया कन्टेंट मोफत देण्यात येणार आहे. तसेच कोडी, नास्टी ट्रॅवलर्स आणि पॉप्युलर सायन्स सारखी मॅगझिन्स आणि कोल्डप्ले, द रोलींग स्टोन यांसारख्या ब्रँडची गाणीही मोफत देण्यात येणार आहेत.

Leave a Comment