इस्लामाबाद दि. २८ – अग्नेय पाकिस्तानमधील सिबी रेल्वे स्थानकावर झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात पाच जण ठार, तर १८ जण जखमी झाले. बुधवारी (ता. २७) मध्यरात्री हा बॉम्बस्फोट झाला.

इस्लामाबाद दि. २८ – अग्नेय पाकिस्तानमधील सिबी रेल्वे स्थानकावर झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात पाच जण ठार, तर १८ जण जखमी झाले. बुधवारी (ता. २७) मध्यरात्री हा बॉम्बस्फोट झाला.
रेल्वे स्थानकावरील चहाच्या टपरीमध्ये बॉम्ब लपवून ठेवण्यात आला होता. जाफर एक्स्प्रेस स्थानकावर उभी असताना रिमोट कंट्रोलच्या साह्याने बॉम्बचा स्फोट घडवून आणण्यात आला.
या स्फोटात पाच जण जागीच ठार झाले. त्यात एका रेल्वे पोलिसाचा समावेश आहे. तर, १८ जण जखमी झाले असून त्यातील आठ जणांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त शाहीद सलीम कुरेशी यांनी दिली.
सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. जाफर एक्स्प्रेस रावळपिंडीहून कुएट्टाकडे निघाली होती.अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही.