अबू अन्सारी उर्फ अबू हमजा माझा मुलगा नाही – रेहाना बेगम

बीड,दि. २८ –मुंबईवर २६-११ ला झालेल्या हल्ल्यातला दहशतवादी अबू अन्सारी हा आपला मुलगा नाहीच, असा दावा जबीउद्दीन अन्सारीच्या आई रेहाना बेगम यांनी केला आहे.

मूळचा बीडचा जबीउद्दीन अन्सारीच आता अबू जिंदाल, अबू हमजा या नावाने दहशतवादी कारवाया करत असल्याची माहिती पुढे आल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी हा खुलासा केला आहे. अबू हमजा आणि अबू जिंदाल म्हणजे जबीउद्दीन नव्हे, असा दावा जबीउद्दीनची आई रेहाना बेगम यांनी केला आहे. तसेच आपली डीएनए चाचणी झालेली नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. पोलिसांनी पकडलेला अबू जिंदाल वेगळाच आहे, तो आपला मुलगा नाही, शिवाय त्याने ५० लाख रुपये पाठवल्याची माहिती चुकीची आहे, असा खुलासा रेहाना बेगम यांनी आज बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन केला व जबीउद्दीनवर होणारे सर्व आरोप फेटाळून लावले.

मुंबईवर २६-११ रोजी झालेल्या हल्ल्याच्या आरोपाखाली जबीउद्दीनला सोमवारी पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा जबीउद्दीनला उर्फ अबू हमजावर आरोप आहे.

Leave a Comment