बिग बेनच्या क्लॉक टॉवरला महाराणी `एलिजाबेथ’चे नाव

लंडन, दि. २८ – लंडनच्या बिग बेनच्या क्लॉक टॉवरचे नाव आता बदलून `एलिजाबेथ टॉवर’ असे ठेवले जाणार आहे. हाउस ऑफ कॉमंसने यास दुजोरा दिला आहे. सध्या यास क्लॉक टॉवर या नावाने ओळखले जाते. या टॉवरमध्ये १३.३ टन वजानाची विशालकाय घंटा आहे. तिला सुरूवातीला बिग बेनचा टाइम दिला होता. त्यामुळे ही घंटा आणि टॉवरला बिग बेनचे नाव प्राप्त झाले. महाराणी एलिजाबेथला राजसत्ता मिळण्याला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बहुतांश खासदार आणि तीन प्रमुख पक्षांनी या टॉवरचे नामांतर करण्याचे अभियान चालविले.

नाव बदलण्याचा प्रस्ताव खासदार टोबियस एल्वुड यांनी मांडला होता. ४० अन्य खासदारांनी या प्रस्तावास पाठिंबा दिला. प्रस्तावात म्हटले की,  महाराणी एलिजाबेथ यांनी ६० वर्षे देशाची सेवा केल्याचा गौरव म्हणून या मागणीचा विचार झाला पाहिजे. एल्वुड यांनी यासंदर्भात खासदारांना पत्र लिहिले होते. डेविड कैमरॉन, निक क्लेग आणि एड मिलीबैंड यांच्यासहित निम्म्याहून जास्त खासदारांनी या प्रस्तावास पाठिंबा दिला होता. पंतप्रधान आणि मजुर नेत्याने हे अभियान म्हणजे महाराणीचा खराखुरा गौरव होय.

१८६० मध्ये राजमहलाची पुनर्उभारणी झाली तेव्हा किंग्स टॉवरचे नाव बदलून `क्वीन व्हिक्टोरिया’ असे ठेवण्यात आले होते.