
अर्जुन तेंडुलकरने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाउल ठेवले असून मुंबई क्रिकेट संघाच्या १४ वर्षाखालील संभाव्य संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. या संघात निवड झालेल्या खेळाडूचे प्रशिक्षण शिबीर पुढील महिन्यात घेण्यात येणार आहे. १२ वर्षींय अर्जुन तेंडुलकर डावखुरा फलंदाज व डावखुरा मध्यमगती गोलंदाज आहे.
