सहारा समूह युकेमध्ये इंडिया सेंटर उभारणार

युकेमध्ये ऑलिंपिक युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडनच्या सहकार्याने इंडिया सेंटर उभारण्याचा निर्णय भारतातील प्रसिद्ध सहारा समुहाने घेतला असल्याचे सहारा इंडिया परिवारचे चेअरमन सुब्रोतो रॉय यांनी जाहीर केले आहे. यासंबंधात त्यांनी नुकतीच ब्रिटीश पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांच्याशी चर्चा केली होती. कॅमेरून यांच्याकडे रॉय यांनी त्यांच्या उद्योगसमुहासाठी युकेत व्यवसाय संधी कशा आहेत याची माहिती घेतल्यानंतरच हा निर्णय घेतला असल्याचे समजते. चार एकर जागेत इंडिया सेंटरची उभारणी केली जाणार आहे.

ब्रिटीश पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनीही हे सेंटर म्हणजे कार्पोरेट आणि विद्यापीठ यांची योग्य सांगड घालून व्यवसाय संधीसाठी मोलाची मदत ठरेल असे मत व्यक्त केले आहे. कॅमेरून यांनी यावेळी सुब्रोतो रॉय यांना लंडन ऑलिंपिकच्या उदघाटन सोहळ्यासाठी त्यांचे पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे आमंत्रणही दिले असल्याचे समजते.