जॉन अब्राहम करणार आयटम सॉंग

जीवनात माणसाला सफलता मिळत असेल तर तो काहीही करण्यासाठी सदैव तयार असतो. तो कुठलेही  काम करायला मागे पुढे पाहत नाही. असेच आता अभिनेता जॉन अब्राहमचे झाले आहे. नुसता डान्स करायचा म्हणून घाबरणारा जॉन अब्राहम आता म्हणेल तसा अवघड डान्स करण्यास तयार होत आहे.

सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार शूट आउट इट वडाला या चित्रपटात प्रेक्षकाना जॉन अब्राहमचे आयटम सॉंग पाहायला मिळणार आहे. विक्की डोनर या चित्रपटापासून त्याला चांगलीच डान्स करण्याची सवय झाली आहे. त्याच्या या डान्सचे अनेकानी कौतुक केले होते त्यामुळे जॉन सध्या चांगलाच फॉर्मात आहे.त्याला पारंपारिक पद्धतीचा डान्स केलेला आवडत नाही. जॉन सध्या कोरिओग्राफरकडून डान्स शिकत आहे.

गेल्या काही दिवसापासून जॉन अब्राहमने  डान्स व अभिनयाशिवाय त्याचा लूक कसा चांगला दिसेल यावरही लक्ष केंद्रित केले आहे. फोर्स या त्याच्या चित्रपटात त्याच्या बॉडीची चर्चाच आधिक आहे.या चित्रपटातील त्याची भूमिका टपोरी युवकाची असल्याने तो सध्या शहरातील चौका-चौकात फिरून  युवकाची भाषा शिकत आहे. जॉन अभिनयासाठी  घेत असलेले कष्ट पाहता त्याच्यासाठी आगामी काळ निश्चितच यशदायी ठरणार आहे.

Leave a Comment