
आता तर सलमान खान शाहीद कपूरकडे व्यवस्थित बघेल असे वाटते, त्यासाठी कारण ही तसेच आहे. शाहीद आगामी काळात सलमानची पुर्वप्रेमिका कॅटरीनासोबत `इश्क’ हा चित्रपट करणार आहे. त्यामुळे सलमान खानला शाहिदची काही काळ का होईना मनधरणी करावी लागणार आहे. ही जोडी फक्त ऑन स्क्रीनच असणार आहे. नाही तर सलमान खानवर काय वेळ आली असते याचे वर्णनही न केलेलेच बरे. आगामी काळात जर सर्व काही ठीक चालले तर प्रभूदेवाच्या `नमक’ या चित्रपटात कॅटरीनासोबत शाहीद कपूर दिसणार आहे.
