रितिक रोशन डान्समध्ये अव्वल

रितिक रोशनच्या चाहत्यासाठी एक चांगली बातमी आहे. त्याचा कुठला चित्रपट हिट ठरला नसून रितिकने डान्समध्ये अव्वल स्थान पटकाविले. अभिनेत्यामध्ये क्रमांक एक त्याने पटकाविला आहे. त्यामुळेच सध्या रितिक जरासा खुश दिसत आहे.

एका मेडिया मार्फत डान्स करणाऱ्या अभिनेत्याचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणातून भारतातील पाच बेस्ट डान्सरची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये रितिक रोशनला नंबर वनचा किताब देण्यात आला आहे. या सर्वेक्षनात रितिक हा त्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या अभिनेता शाहीद कपूर याच्यापेक्षा सुमारे ६० टक्के मताने पुढे असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.

दुसऱ्या नंबरवर शाहीद कपूरने आघाडी घेतली आहे. तर `धक धक गर्ल’ म्हणून चित्रपटसृष्टीत नाव कामविणारी माधुरी दिक्षितने तिसरा नंबर पटकाविला आहे. त्यापाठोपाठ चौथ्या नंबरवर दक्षिणात्य डान्सर म्हणून नाव कमविणारा प्रभू देवा आहे. तर पाचव्या नंबरवर सोंदर्यवती ऐश्वर्या राय हिने झेप घेतली आहे.
रितीकचा चित्रपट हिट ठरला नसला तरी त्याच्या चाहत्यासाठी मात्र ही सध्यासाठी तर चांगली बातमी ठरणार आहे.  

Leave a Comment