विना मलिकची उत्सुकता वाढली

पाकिस्तानी अभिनेत्री विना मलिकने चित्रपटसृष्टीत तिने हळूहळू पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात येत असलेल्या तिच्या `दाल मी कुछ काला’ या चित्रपटात ती दुहेरी भूमिका करणार आहे. या चित्रपटाबाबत सध्या विना मलिक खुपच उत्साहित झाली असून हा अभिनय करण्यासाठीची सर्व तयारी तिने पूर्ण केली आहे. सध्या तिच्या व्यक्तीगत जीवनाबाबत ही तिची दुहेरी अशीच ओळख आहे.

याबाबत तिने खुलासा केला असून मी चित्रपटात जरी दुहेरी भूमिका करीत असली तरी ही भूमिका माझ्यासाठी नवी अशी नाही आहे.  दोन मुली आहेत एक झाहिदा मलिक तर दुसरी आहे विना मलिक यांची भूमिका मी सध्या व्यक्तीगत आयुष्यात निभावत आहे.

छोट्या पडद्यावरील बिग बॉसमध्ये सहभगी होऊन तिने भारतामध्ये मोठी लोकप्रियता मिळावली असून या ठिकाणी तीचा वेगळा असा प्रेक्षक वर्ग निर्माण करण्यात ती यशस्वी झाली आहे. त्यानंतर हि तिने आपली घोडदौड सुरूच ठेवली आहे. तिचा काही दिवसातच तेलगुमधील `द डर्टी’ चित्रपट येत आहे. याशिवाय सध्या  तिच्याकडे मुंबई १२५ किलो मीटर व जिंदगी ५०-५० असे चित्रपट तिच्याकडे आहेत. त्यामुळे आगामी काळात अभिनयाच्या माध्यमातुन ती कितपत यशस्वी होणार हे येणारा काळ ठरविणार आहे.