
नवी दिल्ली, दि. २२ – आपण कोणत्याही दबावाखाली नसून, आपल्याला २०११ साली झालेल्या आशियाई सामन्यांमध्ये सानिया मिर्झासोबत खेळण्याचा अनुभव आहे. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेमध्येही आपण लिएंडर पेससोबत चांगला खेळ करू, असा विश्वास ऑलिम्पिकसाठी पेसचा साथीदार म्हणून निवड झाल्यानंतर विष्णू वर्धन याने व्यक्त केला. आपण २०१० साली च्वांगझ्याहु इथे झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये सानिया मिर्झासोबत खेळताना दबावाखाली होतो. त्यामुळे दबाव कसा हाताळायचा हे आता आपल्याला व्यवस्थित उमगले आहे, असे विष्णूने सांगितले.
