
मुंबई, दि. २२ – रिझर्व्ह बँकेने निर्यातदारांना व्याजदरात देण्यात येणार्या २ टक्के व्याजदर अनुदानाच्या योजनेची मुदत एका वर्षाने वाढविली आहे. निर्यातदारांना रुपयामध्ये करण्यात आलेल्या पतपुरवठ्याची ही सवलत देण्यात येते. हस्तशिल्प, हातमाग, तयार कपडे, प्रक्रिया केलेली कृषी उत्पादने व कारपेट या उद्योगांना दिली जाणारी ही सवलत आता ३१ मार्च २०१२ पर्यंत लागू असेल, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
