
मुंबई दि.२०-‘यूपीए’चे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांच्या उमेदवारीस शिवसेनेने पाठिंबा दिला याचा अर्थ काँग्रेसला पाठिंबा दिला असा होत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी बुधवारी येथे केले. ते म्हणाले, होय, आम्ही मुखर्जींना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पाठिंबा दिला, पण, त्याचा अर्थ काँग्रेसला नाही, असे शिवसेनेच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव यांनी सांगितले.
