
पाकिस्तानची वेगवान राष्ट्रीय धावपटू मुबीन अख्तर हिने विषारी गोळ्या घेऊन आत्महत्त्या केली असल्याचे समजते. मुबीनच्या नातेवाईकांकडून यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार मुबीनला तिचा प्रियकर धावपटू लियाकत अली याने त्यांच्या विवाहाला कुटुंबियांकडून विरोध असल्याचे सांगितले. त्यामुळे त्या दोघांमध्ये भांडण झाले आणि त्यातून मुबीनने विषारी गोळ्या घेतल्या. तिला ताबडतोब सर्विस रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत.
