सोनमची वेगळी ओळख

बॉलीवूडमध्ये दाखल झालेला प्रत्येक कलाकार आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सतत धडपडत असतो. यामध्ये काहीजण यशस्वी होतात. अल्पावधीतच बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण करण्यात कपूर घराण्याची कन्या असलेली सोनम कपूर मात्र यशस्वी झाली आहे.

अन्य अभिनेत्रींच्या तुलनेत कपड्यांची निवड आणि प्रत्येक चित्रपटातील वेगळ्या स्टाईलमध्ये ती चांगलीच प्रकाशझोतात आली. आगामी काळात सोनमचा ‘रांझना’ हा चित्रपट येत आहे. या चित्रपटात तिने छोट्या शहरातील मुलीची भूमिका केली आहे.

प्रवाहाच्याविरुद्ध नेहमीच मार्गक्रमण करायला तिला आवडते. त्यामुळे ती आतापर्यंतच्या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण करता आले आहे. ‘रांझणा’ या चित्रपटात ती रजनीकांतचा जावई व ‘कोलावरी डी’ या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेला अभिनेता धनुष सोबत चमकणार आहे.

या चित्रपटाविषयी बोलताना सोनम म्हणाली की,  नेहमीच मी वेगळे काहीतरी करण्यावर भर देत असते. मला रुटीनच्या भूमिका आवडत नाही. मी अभिनय करीत असताना मी कधीच दुसर्‍या अभिनेत्रीशी स्पर्धा केली नाही. मी स्वत:शीच स्पर्धा करीत असते. आणि त्यावरच मी आगामी काळात ठाम राहणार आहे.

Leave a Comment