
पुणे, दि. १४ – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम यांच्या दर्शनासाठी पुणेकर भाविकांची लागलेली रीघ, अभंगाच्या तालावर डोलणारे वारकरी, अन वैष्णवजनांच्या गर्दीने फुललेले शहरातील रस्ते, यामुळे अवघी पुणेनगरी गुरूवारी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
