सी डी एस प्रशिक्षणासाठी २१ जून २०१२ रोजी निवड

नांदेड, १५ – संघ लोकसेवा आयोग, (UPSC)नवी दिल्ली यांचेमार्फत घेण्यात येणार्‍या कंम्बाईंन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परीक्षेकरीता केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे ऑनलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम मुदत दिनांक २ जुलै २०१२ आहे. जे उमेदवार पदवीधर असून सीडीएस परिक्षेचा फॉर्म ऑनलाईन भरून पाठवतील व रोजगार समाचार मध्ये दिलेल्या शैक्षणिक, शारिरिक, वयोगट पात्रतेनुसार पात्र आहेत अशाच उमेदवारांची निवड परिक्षापूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र , नाशिकरोड, नाशिक येथे करण्यात येणार आहे. सीडीएस परिक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरणेसाठी http://www.upsconline.nic.in या वेबसाईट चा वापर करण्यात यावा.

वयोमर्यादा- आय.एम.ए.२ जुलै १९८९ ते १ जुलै १९९४ या दरम्यान जन्मलेले अविवाहीत भारतीय युवक, नेव्हल ऍकेडमी २ जुलै १९९१ ते १ जुलै १९९४ च्या दरम्यान जन्मलेले अविवाहीत भारतीय युवक (२ जुलै १९८९ नंतर जन्मलेले नेव्हल विंग सी सर्टीफिकेट धारक उमेदार पात्र असतील), एअरफोर्स ऍकेडमी २ जुलै १९९० ते १ जुलै १९९४ च्या दरम्यान जन्मलेले अविवाहीत भारतीय युवक, ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकेडमी २ जुलै १९८८ ते १ जुलै १९९४ च्या दरम्यान जन्मलेले विवाहीत व अविवाहीत भारतीय युवक, ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकेडमी (महिलां करिता) २ जुलै १९८८ ते १ जुलै १९९४ च्या दरम्यान जन्मलेले अविवाहीत, मुले नसलेल्या विधवा पुन्हा विवाह न केलेल्या, मुले नसलेल्या घटस्फोटीत भारतीय महिला.

शैक्षणिक पात्रता- आय.एम.ए. व ओ.टी.ए. विभागासाठी मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर अथवा समकक्ष, नेव्हल ऍकेडमीविभागासाठी अभियांत्रीकी पदवीधर-बी.ई., एअरफोर्स ऍकेडमी विभागासाठी मान्यताप्राप्त विद्यापिठाचा (भौतिक शास्त्र व गणित १०-२ स्तर विषयासह ) पदवीधर किंवा बी.ई.

कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेसच्या परिक्षेची तयारी करून घेणेसाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नशिक रोड , नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे (महाराष्ट्रातील नवयुवकांसाठीच) दिनांक २६ जून २०१२ ते ८ सप्टेंबर २०१२ या कालावधीत प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहेत. निवास व प्रशिक्षणाची सोय शासनातर्फे मोफत करण्यात आलेली असून भोजन (दररोज रूपये ५० घेऊन) अल्प दरात देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
तरी जिल्हयातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नांदेड येथे दिनांक : २१ जून २०१२ रोजी पदवी पर्यंतच्या सर्व मुळ प्रमाणपत्र व गुणपत्रिकेसह आणि ऑनलाईन फॉर्म भरल्या नंतर त्याची प्रिंट घेऊन मुलाखतीचे वेळेस दाखविल्या शिवाय उमेदवाराची निवड करण्यात येणार नाही. मुलाखतीचे वेळी वस्तुनिष्ठ पध्दतीची लेखी परिक्षा व तोंडी मुलाखत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचे कडून घेतली जाईल.

अधिक माहिती करीता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक, यांचा दूरध्वनी क्रमांक ०२५३ – २४५१०३२ येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे अवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कर्नल समीर राउत यांनी केले आहे.

Leave a Comment