वाटर्लूच्या युद्धभूमीवर सापडला २०० वर्षांपूर्वीचा सैनिकाचा सांगाडा

लंडन दि.१४- जगाच्या इतिहासात आजपर्यंत युद्धभूमीवर सापडलेल्या अवशेषांपैकी सर्वात जुना म्हणजे सुमारे दोनशे वर्षापूर्वी वॉटर्लू येथे झालेल्या लढाईत ठार झालेल्या एका ब्रिटीश सैनिकाचा संपूर्ण सांगाडा संशोधकांना सापडला आहे. फ्रान्सच्या नेपोलियन विरूद्ध ब्रिटीश आणि प्रशियाने केलेल्या या लढाईत नेपोलियनचा पराभव झाला होता.

तज्ञांची व्यक्त केलेल्या अंदाजानुसार या सैनिकाचा १८ जून १८१५ मध्ये मृत्यू झाला असावा. युद्धभूमीवरील दाट चिखल असलेल्या जमीनीखाली फूटभर अंतरावर हा सांगाडा सापडला असून हा तरूण सैनिकाचा असावा असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा सैनिक ड्यूक ऑफ वेलिग्टनच्या रेजिमेंटमधील असावा असाही अंदाज वर्तविला गेला आहे. पालथ्या पडलेल्या या सैनिकाच्या सांगाड्यात त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली गोळीही त्याच्या बरगडीत अडकलेली आहे. त्याचबरोबर कांही नाणी, कातड्याचा पटटा, रायफलीच्या दस्त्याच्या लाकडाचा तुकडा आणि सीबी अशी अक्षरे असलेल्या या वस्तूची सापडल्या आहेत. त्यावरून मृत सैनिकाची ओळख पटेल असा विश्वास तज्ञ व्यक्त करत आहेत.

बेल्जियम येथील वॉटर्लू येथे १८८५ साली झालेल्या या युद्धात नेपोलियन आपल्या ७२ हजार सैन्यासह उतरला होता तर मित्रपक्षांचे सुमारे सव्वा लाख सैनिक होते. मित्रपक्षात ब्रिटीश, जर्मन, डच, बेल्जियन आणि प्रशियन सैनिकांचा समावेश होता.

Leave a Comment