
जगभरातच सध्या प्रिंट मिडियाचे थोडेच दिवस शिल्लक असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे इतकेच नव्हे तर जगभरातील अनेक वृत्तपत्रसमूह आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. मात्र जगातील श्रीमंत व्यक्तीत गणना होत असलेले जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफेट यांनी दैनिके खरेदीचा दणकाच लावला असून गेल्या वर्षभरात या व्यवसायात ३० कोटी अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. त्यांच्या गुंतवणुकीमुळे प्रिंट मिडीया खरेच इतिहासजमा होणार का या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
