
बिजिंग दि.११- वेगाने विकसित होत असलेल्या चीन तसेच अन्य देशांच्या तुलनेत भारतात विमानप्रवास तीनशेपट महाग असल्याचे जेट एअरवेजचे प्रमुख नरेश गोयल यांचे म्हणणे आहे. भारतात होत असलेल्या करआकारणीमुळे विमानप्रवास महाग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.परिणामी भारतात विमान वाहतूक उद्योगाची भरभराट होण्यात मोठाच अडथळा निर्माण होत असल्याचे सांगून गोयल म्हणाले की जगात विमानकंपन्यांना सेवा कर आकारणारा भारत हा एकमेव देश आहे. चीनी विमानप्रवास भारताच्या तुलनेत तिप्पट स्वस्त आहे कारण तेथील सरकार विमान कंपन्यांना कर आकारत नाही. चीनमध्ये विमानकंपन्या राज्यांच्या मालकीच्या आहेत आणि या कंपन्यांना प्रथमपासूनच सरकारचा भक्कम पाठींबा आहे.
