
मुंबई दि.८-गर्भलिंग चाचण्या करून अवैधरित्या केल्या जात असलेल्या स्त्रीभ्रूण हत्यांना कायमचा आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने बेकायदेशीर रित्या अशा चाचण्या करणार्या सर्व सोनोग्राफी सेंटर्सना कायमचे टाळे लावण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरवात बीड जिल्ह्यापासून केली जात असून टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्व सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी आणि बेकायदेशीर सोनोग्राफी सेंटर्स बंद करण्यात येतील असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
