अभिषेक वर्मा यांच्या निवासस्थानांवर सीबीआयचे छापे

नवी दिल्ली, दि. ७ – नौदलातील गोपनीय माहिती फुटल्याप्रकरणी सीबीआयने या प्रकरणातील आरोपी अभिषेक वर्मा यांच्या निवासस्थानी गुरूवारी छापे घातले. काँग्रसचे माजी खासदार श्रीकांत वर्मा यांचे अभिषेक वर्मा पुत्र आहेत. अभिषेक वर्मा यांच्या दिल्ली येथील निवासस्थानासह अन्य दहा ठिकाणी छापे घालण्यात आल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली.

सीबीआयने वर्मा यांच्या निवासस्थानामधून काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. अभिषेक वर्मा याच्यावर स्वित्झर्लंडमधील रेन मेटाल या कंपनीकडून शस्त्रास्त्र विक्रीमध्ये ५ लाख ३० हजार डॉलरची दलाली घेतल्यासंदर्भात खटला दाखल करण्यात आला आहे.