
नवी दिल्ली, दि. ७ – द्रमुक नेते टी. आर. बालू आणि एम. के. स्टालिन यांनी गुरूवारी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांची भेट घेतली. आगामी राष्ट्रपतीपदासाठी होणार्या निवडणुकीसंदर्भात ही भेट घेतल्याचे सांगण्यात येते. मात्र आपली ही सदिच्छा भेट असल्याचे द्रमुक नेत्यांकडून सांगण्यात आले. द्रमुकच्या या नेत्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेत्या सोनिया गांधी यांचीही भेट घेतली.
