देशातील सर्वात मोठ्या चौपदरी मार्गासाठी करार

मुंबई, दि. ७ – एल अॅण्ड टी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्टस लिमिटेड (एल अॅण्ड टी आयडीपीएल) ने अंदाजे ४,८०० कोटी रूपये किंमतीच्या ४८४ किलोमीटर लांबी असलेल्या चौपदरी रस्त्यांचे दोन प्रकल्प विकसित करण्याकरिता यशस्वी बोली लावली आहे. एल अॅण्ड टी आयडीपीएल ची भागधारक असलेल्या सेपरेट स्पेशल पर्पज व्हेईकल (एनएचएआय) समवेत सवलतीचा करार केला आहे. या दोन्ही प्रकल्पांकरिता २० वर्षे इतका सवलतीचा कालावधी देण्यात आला असून बांधकामाचा कालावधी ३० महिने इतका आहे.

हे प्रकल्प एनएम ६ चा एक भाग असून यामुळे सूरत ते कोलकाता ही शहरे या महामार्गाद्वारे जोडली जातील. बांधा-वापरा-हस्तांतरित करा या तत्वावर महाराष्ट्रा ला देण्यात आलेला हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. हा मार्ग अमरावतीपासून ते जळगावपर्यंत (२७५ किमी, प्रकल्प १) आणि जळगाव ते सुरतजवळून (२०९ किमी, प्रकल्प २) जात आहे. सध्या हा रस्ता दुपदरी असून तो चौपदरी करण्यात येणार आहे.