सचिनला मिळणार झेड प्लस सुरक्षा आणि दिल्लीत बंगला

नवी दिल्ली दि.७ – खासदार सचिन रमेश तेंडुलकर यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्यात येणार आहे तसेच दिल्लीत त्यांना बंगलाही अॅलॉट करण्यात येणार असल्याचे गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि युवराज राहुल गांधी यांच्या बंगल्यापासून जवळच असलेला तुघलख रोडवरील बंगला क्रमांक पाच सचिनला देण्यात येणार आहे. सात हजार स्कवेअर फुट जागेवरील हा बंगला प्रचंड मोठा असून त्यात सात बेडरूम्स आहेत. याआधी या बंगल्यात केंद्रीय गृह सचिव राहात होते. राहुल गांधी यांच्याकडे याच रस्त्यावरील १२ नंबरचा बंगला आहे. सुरक्षा संस्थांकडून बंगल्याची पूर्ण तपासणी केल्यानंतरच सचिनच्या ताब्यात हा बंगला दिला जाणार आहे.
 
सचिनप्रमाणेच नुकताच शपथविधी झालेल्या खासदार अभिनेत्री रेखा यांनाही कस्तुरबा गांधी रोडवरील बंगला नंबर १५ देण्यात येणार आहे. अतिशय पॉश वस्तीत हा बंगला आहे. यापूर्वी रेखा यांना खासदारांसाठी बांधलेल्या बहुमजली इमारतीत फ्लॅट देण्यात येणार होता मात्र रेखा यांनी तो नाकारला. राज्यसभेत उपस्थित राहण्यासाठी हा फ्लॅट अधिक दूर असल्याचे कारण त्यांनी त्यासाठी दिले होते असेही समजते.

Leave a Comment