
नवी दिल्ली, दि. ३१ – आशियाई शिखर परिषदेच्या ११ व्या संमेलनात सहभागी होण्यासाठी संरक्षणमंत्री ए.के.अँटोनी सिंगापूरला जाणार आहेत. सागरी स्वातंत्र्याचे संरक्षण या विषयावर भारत सरकारची भूमिका अँटोनी या परिषदेत विषद करतील. तसेच या मुद्यावर ते यजमान सिंगापूर समवेतच श्रीलंका, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया, फ्रान्स, कॅनडा आणि टोंगा या देशांशी द्विपक्षीय चर्चा देखील करणार आहेत.
