नॅशनल रोमिंग होणार रद्द

नवी दिल्ली, दि. ३१ – केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाने राष्ट्रीय दूरसंचार धोरण – २०१२ ला मंजूरी दिली आहे. या धोरणानुसार आता देशभरात कोठेही प्रवास करताना ग्राहकांना मोबाईलचे रोमिंग शुल्क भरावे लागणार नाही. केंद्रीय दूरसंचार मंत्री अंबिका सोनी यांनी गुरूवारी या निर्णयाची माहिती दिली.

नवीन धोरणानुसार आता मोबाईल कंपन्यांना संपूर्ण देशासाठी एकच परवाना देण्यात येईल. पयार्याने आता एका विशिष्ट क्षेत्रातच नंबर पोर्टींग करण्याची गरज नसून, संपूर्ण देशभरात एकच नंबर वापरता येईल. तसेच एकच देशभरात सर्कल निश्चित केले जाणार असल्यामुळे लोकल आणि एसटीडी कॉल दरांतील तफावतही कमी होऊ शकेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. या धोरणाचा फायदा परदेशी प्रवास करणार्‍या भारतीयांनाही होऊ शकेल. आंतरराष्ट्रीय रोमिंग सेवा घेणे आता आणखी सोपे होणार असल्यामुळे परदेशी गेलेल्या भारतीयांनाही तेथे आपला मोबाईल नंबर बदलण्याची गरज भासणार नाही. 

Leave a Comment