
मुंबई, दि. २५ – तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची ह्युलेट पॅकार्ड उर्फ एचपी ही कंपनी आपला खर्च कमी करण्यासाठी कर्मचार्यांची कपात करणार आहे. येत्या दोन वर्षांत कंपनी २७ हजार कर्मचार्यांना घरचा रस्ता दाखविणार आहे. दुसर्या तिमाहीत नफ्यामध्ये मोठी घट झाल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
