फेसबुकच्या आयपीओचा गुंतवणूकदारांना धसका

न्यूयॉर्क – हॉटडिल म्हणून चर्चा सुरू झालेला फेसबुकचा बहुचर्चित आयपीओ प्रत्यक्षात बाजारात दाखल होण्यापूर्वीच त्याच्याभोवती संशयाचे वारे घोंगावू लागले असून किरकोळ गुंतवणूकदारांनी या आयपीओचा धसकाच घेतला असल्याचा अनुभव येत आहे.

गुंतवणूकदार आणि या क्षेत्रातील तज्ञ या सर्वांनाच फेसबुकच्या आयपीओमधील गुंतवणूक जोखमीची ठरेल या शंकेने ग्रासले आहे परिणामी या आयपीओत गुंतवणूक करणार्‍यांचा उत्साहही मावळल्याचा अनुभव येत आहे. कांही गुंतवणूकदारांनी तर फेसबुक आणि त्यांची अंडररायटर मॉर्गन स्टॅन्ले यांच्या विरोधात खटलाच दाखल केला आहे. या दोन्ही कंपन्यांनी शेअर विक्रीला येण्यापूर्वीच फेसबुकच्या महसूलवाढीच्या अंदाजात आलेली मोठी घट लपविल्याचा आरोप या खटल्यात करण्यात आला असल्याचे समजते.

Leave a Comment