भारत – पाकिस्तानमधील विद्वेष कमी झाला तर संबंध सुधारतील

मुंबई,  दि. २४ – भारत-पाकिस्तानचा दोन शेजारी देशांमधील संबंध सुधारण्यासाठी सर्वप्रथम दोन्ही देशांमध्ये विद्वेष पसरविणारे कारखाने बंद व्हायला हवेत. दोन्ही देशातील पत्रकारांनी विद्वेष पसरविणारे लिखाण करु नये. तर दोन्ही देशात चांगले संबंध प्रस्थापित होतील. तसेच दोन्ही देशातील लोकशाही मजबूत करणे गरजेचे आहे, असे मत मुंबई दौर्‍यावर आलेल्या पाकिस्तानी पत्रकारांच्या शिष्टमंडळातर्फे कराची प्रेस क्लबचे अध्यक्ष व `इंटरनॅशनल द न्यूज’चे ज्येष्ठ पत्रकार ताहिर हसन खान व पाकिस्तान इन्स्टमुख ऑफ लेबर एज्युकेशन ऑफ रिसर्चचे कार्यकारी संचालक करामत अली यांनी केले.

मुंबई मराठी पत्रकार संघ व प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार संघात पाकिस्तानी पत्रकारांचा वार्तालाप व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी झालेल्या प्रश्नोत्तराच्या निमित्ताने पाकिस्तानी पत्रकारांनी मुंबईतील पत्रकारांनी चांगला संवाध साधला आणि दिलखुलास चर्चा केली.

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले यांनी पाकिस्तानी पत्रकारांचे पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन स्वागत केले. तसेच पाकिस्ताननी पत्रकरानींही अध्यक्ष मटाले व पत्रकार संघाचे विजयकुमार बांदल यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

पत्रकार संघाने पाकिस्तानी १४ पत्रकारांच्या डोक्याला मराठमोळा भगवा फेटा बांधून महाराष्ट्राच्या परंपरेनुसार स्वागत केले.

दक्षिण आशिया खंडातील भारत, पाकिस्तान अन्य देशांनी एकत्रित येऊन शांतता व चांगली लोकशाही प्रस्थापित करायला हवी, असे पत्रकार नग्मा इफ्तेकर यांनी सांगितले.

पाकिस्तानमध्ये हिंदूवर अत्याचार होत असल्याचे हैदराबाद येथील प्रेस क्लबचे महेश कुमार यांनी मान्य केले. मात्र, त्यास काही समाजकंटक जबाबदार असून त्यास सर्वांना जबाबदार धरण्यात येऊ नये, असे सांगितले. तसेच भारतात जेंव्हा बाबरी मशीद जमीनदोस्त केल्यानंतर भारतातही मुस्लिमांची स्थिती अत्यंत वाईट होती, असे निदर्शनास आणून दिले.

पाकिस्तानमध्ये जिहादी कारवायांना अमेरिकेनेच हवा दिली. अमेरिकेशी पाकिस्तानने मैत्री केल्याचे परिणाम पाकिस्तानने भोगले आहे. मात्र,  भारत त्यातून बचावला असला तरी दोन्ही देशातील गरीबीही कारणीभूत आहे, असे करामत म्हणाले.

दोन्ही देशात पत्रकारांना पत्रकारितेसाठी मोकळीक सरकारने द्यायला हवी. दोन्ही देशातील क्रिकेट खेळाडूंना सामने खेळायला परवानगी द्यायला हवी. पाकिस्तानात लोकशाही आता मजूबत होत आहे. मुशर्रफ यांच्यावेळी लष्कराचे वर्चस्व होते. मात्र, आता पूर्वीसारखा पाकिस्तान राहिलेला नाही, असेही करामत अली म्हणाले.

पाकिस्तानात काही प्रमाणात गुन्हेगारी घटना घडतात तशा भारतातही घडतात. पाकिस्तानात वारंवार बदलणारे सरकार व काही माफिया गुन्हेगारीस कारणीभूत होते. आता तेथे महिलांबाबतचे गुन्हेही कमी झालेत असे ताहीर खान म्हणाले.

Leave a Comment