सलमानच्या टायगरचा प्रोमो

 दबंग सलमान खान आता टायगरच्या रूपात त्याच्या चाहत्यांना भेटायला येतोय.‘एक था टायगर’या चित्रपटाचा ऑनलाईन प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले असून चित्रपटात सलमान खान पुन्हा एकदा कॅटरिना कैफसोबत दिसणार आहे. यशराज बॅनरखाली हा चित्रपट बनतो आहे. या प्रोमोनंतर कबीर खाननं ट्विटर प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तो म्हणतो, तुमच्या शानदार प्रतिक्रियांबद्दल मी तुमचा आभारी आहे. ‘एक था टायगर’च्या फोटोवर हजारो ट्विट आले आहेत; पण त्या सगळ्यांना उत्तर देणं मात्र कठीण आहे.यू ट्यूबवर या चित्रपटाचा प्रोमो पाहण्यासाठी तर लोकांनी अक्षरश उड्या मारल्या. काही वेळातच हा प्रोमो पाहणर्‍यांची संख्या लाखोंवर पोहोचली होती. कबीर म्हणतो, तीन मिनिटांच्या आत सर्व्हर तर हँग होणार नाही ना, अशी भीती मला वाटत होती. प्रोमो लाँच झाल्यानंतर केवळ तीन मिनिटांत तो हिट झाला होता.