
माद्रिद, दि. १० – भारताच्या महेश भूपती आणि रोहन बोपण्णा या जोडीने माद्रिद टेनिस स्पर्धेच्या दुहेरीतील उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या जोडीने मेक्सिकोचा गोंझालेज आणि जर्मनीचा ख्रिस्तोफर या जोडीचा ६-१, ७-६ असा पराभव केला. दोघांनीही चांगली खेळी खेळत पहिला सेट आपल्या नावे केला. परंतु दुसर्या सेटमध्ये थोडा संघर्ष करावा लागला. पण शेवटी तो ही आपल्या नावे करीत सामना जिंकला. भारताचा लिएंडर पेस आणि चेक प्रजासत्ताकचा रॅडेक स्टेपनिक ही जोडी दुसर्या फेरित फ्रेंचच्या रिचर्ड गॅसक्वेट आणि मॉनफील्स या जोडीशी दोन हात करेल.
