दिल्ली, दि. १० – भारतीय ज्युडोपटू गरीमा चौधरी लंडन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ती एकमेव भारतीय ज्युडोपटू आहे. आशिया खंडातील कोट्यातून ६३ किलो वजनी गटात गरीमाची निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या आशियाई ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेत तिने ७ वे स्थान पटकावले होते. जागतिक क्रमवारीत ती ८८ व्या स्थानावर असल्यामुळे आशियाई कोटयातून तिची निवड केली गेली.
