
मुंबई महापालिका कायद्यानुसार सार्वजनिक उद्देशाने चालविल्या जाणार्या संस्थांना घरपट्टी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. त्यामुळेच शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या इमारतींवर आकारण्यात आलेली घरपट्टीची संपूर्ण रक्कम व्याजासहित परत करावी, असा महत्वपूर्ण निकाल नगरच्या वरिष्ठ स्तर सहदिवाणी न्यायाधीश प्रताप शिदे यांनी दिला.
