हर्षदीप कौर गाणार मराठी सिनेमात

मराठी चित्रपट संगीताच्या वाढत्या क्रेझमुळे मराठी सोबत अमराठी गायकांचाही मराठी संगीताकडे ओढा दिसून येतोय. यात आणखी एक लोकपिय नाव दाखल होत आहे… सुफी गायिका हर्षदीप कौर.

   कतीया करु.. हे रॉकस्टार मधील गाणं किवा बँड बाजा बारात मधलं बारी बरसी.. असो. रंग दे बसंती मधील धीरगंभीर गीत एक ओंकार.. किवा झक मार के.. हे देसी बॉय मधील भन्नाट गीत असो हर्षदीप कौर हिचा आवाज आता आपल्या चांगलाच परिचयाचा झालाय. छोटया पडदयावर सलग दोन रिऍलिटी शोमध्ये विजेती ठरलेली हर्षदीप तिच्या सुङ्गी गायनासाठी पसिध्द आहे. तिच्या आवाजाची जादू आता मराठी चित्रपटात अनुभवता येणार आहे.

  प्राप्ती ङ्गिल्मस बॅनरच्या मिस्टर ना.ना.नकोस या आगामी मराठी चित्रपटाद्वारे हर्षदीप कौर मराठीत पदार्पण करते आहे. आली रे आली चंद्रमुखी.. असे बोल असलेलं हे आयटम साँग गीतकार तन्वीर गाझी यांनी लिहिले आहे. या गीतात हर्षदीप कौर हिला साथ दिली आहे सारेगमप फेम  रोहित राऊत यांने. या चित्रपटातून रोहित पथमच पार्श्वगायक म्हणून पेक्षकांसमोर येतोय. दिलीप लक्ष्मण पाटील, उन्मेश राव आणि शंकर निकाळजे यांची निर्मिती असलेल्या मिस्टर ना.ना.नकोसे चित्रपटाचे दिग्दर्शन संजय-मोहम्मद यांनी केले असून संगीत पंकज-पुष्कर यांनी दिले आहे.

 मिस्टर ना.ना.नकोसे या सर्वसामान्य माणसाची कथा मजेशीर ढंगात यात गुंङ्गण्यात आली आहे. आयुष्यात प्रत्येक वेळी नकारघंटा मिळालेले नाना नकारात्मक विचारांनी त्रासलेले आहेत. एकेदिवशी त्यांच्या भूतकाळातली एक घटना त्यांच्या वर्तमानात येऊन त्यांचा भविष्यकाळ कशापकारे बदलून टाकते. याचे धमाल, करमणूकपधान चित्रण म्हणजे मिस्टर ना.ना.नकोसे हा चित्रपट.

   चित्रपटात मिस्टर ना.ना.नकोसे ही व्यत्तिरेखा भरत जाधव साकारीत असून किशोरी शहाणे त्यांच्या बायकोच्या भूमिकेत आहे. त्यांच्यासह आदिनाथ कोठारे, तन्वी परब, आशिष गाडे, विजू खोटे, भरत दाभोळकर, केदार शिदे, सुनील पाल, नकुल घाणेकर, निशा परुळेकर या कलाकारांच्या भूमिका आहेत

Leave a Comment