आयपीएलच्या पाचव्या हंगामात दिल्ली हॉट

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) थरार व उत्सुकता शिगेला पोचत असून, तापमानासोबत सट्टा बाजारातील वातावरण देखील तापत चालले आहे. सट्टेबाजांच्या यादीत दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ सध्या हॉट फेव्हरीट आहे. प्रत्यक्षात आयपीएलचा मुकुट कोणत्या संघाच्या शिरपेचात रोवला जाणार हे नंतर ठरणार असले तरी, आयपीएल किगच्या शर्यतीत दिल्लीनंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स हेही आघाडीवर आहेत. सट्टेबाजांनी या तीनच संघांना सर्वाधिक पसंती दिली आहे. अंतिम क्षणी नाट्यमय घडामोडी घडून राजस्थान रॉयल्स सुपर ओव्हरमध्ये बाजी मारू शकतो, असेही सट्टेबाजांचे म्हणणे आहे. 

आयपीएलचा महाकुंभ चार एप्रिलला सुरू झाला असून अर्धेअधिक सामने आता संपले आहेत. परंतु आता खर्‍या लढतींना सुरुवात होणार आहे. सट्टेबाजांनी विजेत्या संघासोबतच स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंबद्दलही अंदाज व्यत्त* केले आहेत. सर्वाधिक धावा काढणार्‍यांमध्ये सध्या आघाडीवर असलेला राजस्थान रॉयल्सचा अजिक्य रहाणे (४५८ धावा), दिल्लीचा वीरेंद्र सेहवाग (४४५ धावा) आणि कोलकताचा गौतम  गंभीर (३६५ धावा) या तिघांना सट्टेबाजांनी झुकते माप दिले असून, त्यांचा धमाका यापुढेही कायम राहिल्यास तिघांपैकी एक उत्कृष्ट फलंदाज ठरू शकतो. या तिघांमध्ये बहुतेक सेहवागच फलंदाजीचा बादशाह ठरेल, असा अंदाज सट्टेबाजांनी वर्तविला आहे. 

संघाचे सट्टाबाजारातील भावही वर-खाली होत आहेत. मात्र, त्यातही दिल्ली, कोलकता आणि मुंबई हेच सट्टेबाजांचे हॉट फेव्हरीट आहेत. सट्टेबाजांना बंगळूर आणि चेन्नई संघांमध्येही दम दिसत आहे. धोनीची जादू चालली तर चेन्नई संघसुद्धा विजेतेपदाची हॅट्कि करू शकतो, असे मतही सट्टेबाजांनी व्यत्त केले आहे. 

Leave a Comment