
इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) थरार व उत्सुकता शिगेला पोचत असून, तापमानासोबत सट्टा बाजारातील वातावरण देखील तापत चालले आहे. सट्टेबाजांच्या यादीत दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ सध्या हॉट फेव्हरीट आहे. प्रत्यक्षात आयपीएलचा मुकुट कोणत्या संघाच्या शिरपेचात रोवला जाणार हे नंतर ठरणार असले तरी, आयपीएल किगच्या शर्यतीत दिल्लीनंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स हेही आघाडीवर आहेत. सट्टेबाजांनी या तीनच संघांना सर्वाधिक पसंती दिली आहे. अंतिम क्षणी नाट्यमय घडामोडी घडून राजस्थान रॉयल्स सुपर ओव्हरमध्ये बाजी मारू शकतो, असेही सट्टेबाजांचे म्हणणे आहे.
