पाकिस्तानी सेना व आयएसआयला ओसमाचा ठिकाणा माहित होता – विकीलिक्स

वॉशिग्टन- अलकायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा-बिन-लादेन याचा ठावठिकाणा पाकिस्तानी सेना व गुप्तहेर संघटना आयएसआयला माहित होता. मात्र, पाकिस्तान सरकार यासंदर्भात सातत्याने खोटे बोलत आले आहे. पाकिस्तानी सेना आणि गुप्तचर यंत्रणेचा लादेनबरोबर सतत संफ होता, असा दावा विकीलिक्सने केला आहे. अमेरिकेतील हेरगिरी करणारी खासगी संस्था स्ट*ेटफोरच्या ईमेलमध्ये याचा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे.
आयएसआयच्या अनेक वरीष्ठ तसेच कनिष्ठ अधिकार्‍यांसह पाकिस्तानी लष्कराच्या एका निवृत्त जनरललाही ओसामा अॅबोटाबादमध्ये लपल्याची पूर्ण माहिती होती, असे विकीलिक्सने उघडकेलेल्या स्ट*ेटफोरचे उपाध्यक्ष फड बर्टन यांनी आपल्या ईमेलमध्ये लिहिले आहे. बर्टन हे सुरक्षा, दहशतवादी संघटना व त्यांच्या कारवायासंबंधीत माहितीसाठी जगातील एक मोठे तज्ज्ञ मानले जातात. सदर माहिती आपल्याला पाकिस्तानी सूत्रांकडून मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. आयएसआयच्या सुमारे १२ अधिकार्‍यांनी ओसामाच्या निवास्थानाबद्दल माहिती होती. पाकिस्तानी सूत्रांनी त्या अधिकार्‍यांचे नावे जाहीर केले नाही. मात्र, इतर महत्वाची माहिती उपलब्ध करुन दिलेली आहे. तसेच अमेरिकी गुप्हेर संस्थेलाही याची पूर्ण माहिती होती, असे त्यांनी प्रतिपादन केले. 
दरम्यान, स्ट*ेटफोरचे अनेक ग्राहक अमेरिकी लष्करात व गुप्तहेर संस्थेत काम करतात. मात्र, त्यांनी पाकिस्तानचे वादग्रस्त जनरल व आयएसआयचे माजी प्रमुख हमीद गुल यांना सदस्यता दिली होती, असा आरोप विकीलिक्सने केला आहे. स्ट*ेटफोरचे लाखो ईमेल आपल्याकडे असल्याचा दावाही विकीलिक्सने यावेळी केला. तसेच या ईमेलमधून पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडकीस आला असल्याचे त्यांनी सांगितले.